belgaum

गोवावेस येथील मनपाच्या ‘त्या’ जागेसाठी 2.98 लाखांची बोली

0
216
City corporation logo
City corporation logo
 belgaum

बेळगाव लाईव्ह :गोवावेस, बेळगाव येथील महानगरपालिकेच्या जागेसाठी अखेर भाडेकरू मिळाला असून काल गुरुवारी झालेल्या लिलावात सदर जागेसाठी 2,98,878 रुपये इतकी सर्वोच्च बोली लागली. ज्यावर स्वतंत्रपणे जीएसटी आकारला जाईल.

गोवावेस येथील महावीर भवन समोरील श्री दत्त मंदिराशेजारील संबंधित जागेवर पेट्रोल पंप स्थापन करावा अशी महापालिकेची अट आहे. त्यानुसार ती जागा भाडेतत्त्वावर घेतलेल्या यशस्वी बोलीदाराला त्या ठिकाणी पेट्रोल पंप सुरू करावा लागेल आणि चालवावा लागेल.

गोवावेस येथील सदर जागा पूर्वी खाजगी कारणांसाठी वापरली जात होती. सदर जागेच्या लिलावामध्ये तिघाबोली लावणाऱ्यांनी सहभाग घेतला होता. जागेच्या लिलावासाठी महापालिकेकडून 2,58, 878 रुपये इतकी मूळ बोली निश्चित करण्यात आली होती.

 belgaum

लिलावात या बोलीवर 40 हजार रुपये वाढीव बोलू लागली असून ही 2 लाख 98 हजार 878 रुपयांची सर्वाधिक बोली इरनगौडा पाटील यांनी लावली. त्यामुळे आता संबंधित जागेचे दरमहा 2 लाख 98 हजार रुपये इतके भाडे महापालिकेला मिळणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.