belgaum

बेळगावात बनावट नोटांचा मोठा पर्दाफाश;

0
842
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील बाजारपेठेत ५०० रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा मार्केट पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात बनावट चलन आणि गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली आहे.

खडेबाजार रस्त्यावरील एका दुकानात आरोपींनी साहित्य खरेदी केल्यानंतर दुकानदाराला ५०० रुपयांच्या नोटा दिल्या होत्या. या नोटा बनावट असल्याचा संशय आल्याने दुकानदाराने तातडीने पोलिसांना माहिती दिली.

मार्केट पोलीस ठाण्याचे निरीक्षक जे. एम. कालमिर्ची यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेत मोहम्मद अर्बाज, रुपेश वाकोडे, मोहम्मद हुसेन बक्षी (सर्व रा. गोवा) आणि श्रवणकुमार (रा. बिहार) या चौघांना ताब्यात घेतले.

 belgaum

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत आरोपींनी बनावट नोटा चलनात आणण्याच्या उद्देशाने आल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून ५०० रुपये दराच्या ४९५ बनावट नोटा, ४० हजार रुपये किमतीचे चार मोबाईल आणि ३ लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी स्विफ्ट कार असा एकूण साडेतीन लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मार्केट पोलीस ठाण्याचे निरीक्षक जे. एम. कालमिर्ची, उपनिरीक्षक हुसेनसाब केरूर आणि त्यांच्या पथकाने केलेल्या या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त भूषण बोरसे आणि पोलीस उपायुक्तांनी पथकाची प्रशंसा केली आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.


 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.