बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्याच्या बाहेरील भागात असलेल्या श्री रेणुका यल्लम्मा मंदिरातील हुंडी मोजणी पूर्ण झाली असून यावेळी तब्बल 3 कोटी 7 लाख रुपयांची विक्रमी देणगी जमा झाली आहे.
मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, हुंडी मोजणीदरम्यान 2 कोटी 78 लाख रुपये रोख, सुमारे 16.16 लाख रुपयांचे 100 ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच 12.35 लाख रुपयांच्या किमतीचे 4 किलो 547 ग्रॅम चांदीचे दागिने जमा झाले आहेत.

मागील आठवड्यातही हुंडी मोजणीची प्रक्रिया पार पडली होती. 9 ते 12 मार्च दरम्यान झालेल्या मोजणीत ही विक्रमी देणगी जमा झाली. मंदिरातील कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांच्या मदतीने हुंडी मोजणीचे काम करण्यात आले.
दरम्यान, जमा झालेली रक्कम मंदिराच्या विकासकामांसाठी वापरण्यात येणार असल्याचे मंदिर प्रशासनाने स्पष्ट केले आहे.





