belgaum

नियम उल्लंघन करणाऱ्या डीसीसी बँकेच्या 7 संचालकांना अपात्र ठरवा -गडाद

0
225
bhimappa gadad
 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव डीसीसी बँकेत भारतीय रिझर्व बँकेच्या नियम, कायद्याचे उल्लंघन करून कार्यरत असलेल्या अण्णासाहेब जोल्ले, लक्ष्मण सवदी यांच्यासह एकूण 7 संचालकांना सरकारने तात्काळ अपात्र ठरवावे, अशी मागणी मुडलगी येथील उत्तर कर्नाटक होराट समितीचे अध्यक्ष व माहिती हक्क कार्यकर्ता भीमप्पा गडाद यांनी केली आहे.

बेळगाव मध्ये आज सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. भीमप्पा गडाद म्हणाले की, भारतीय रिझर्व बँकेच्या (आरबीआय) नव्या कायद्यानुसार आरबीआयच्या अधीपत्त्याखाली येणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँक आणि अर्बन बँकांमध्ये एखाद्याला 10 वर्षापेक्षा अधिक काळ संचालक म्हणून कार्यरत राहता येत नाही. यासंदर्भात मी राज्य सरकारला अर्ज सादर केला आहे.

त्याद्वारे बेळगाव डीसीसी अर्थात बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह राज्यात जितक्या डीसीसी बँक आणि अर्बन बँकांमध्ये 10 वर्षापेक्षा अधिक काळापासून जे कोणी संचालक म्हणून कार्य करत आहेत त्यांना तात्काळ हटवण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

 belgaum

माझ्या माहितीनुसार बेळगाव डीसीसी बँकेमध्ये एकूण सात जण 10 वर्षापेक्षा अधिक काळ संचालकपदी ठाण मांडून आहेत. त्यामुळे आरबीआयच्या नियम, कायद्यानुसार हे सर्वजण संचालक पदासाठी अपात्र आहेत.

Dcc bank
Dcc bank

या अपात्र संचालकांमध्ये अण्णासाहेब जोल्ले, लक्ष्मण सवदी, महांतेश दोड्डगौड, अरविंद पाटील, नीलकंठ कपलगुद्दी, आप्पासाहेब कुलगुडे आदींचा समावेश आहे. या सर्वांवर सरकारने तात्काळ कारवाई करून त्यांना अपात्र ठरवावे, अन्यथा आम्ही उच्च न्यायालयात खटला दाखल करून कायदेशीर लढा देऊ, असे माहिती हक्क कार्यकर्ता भीमप्पा गडाद यांनी शेवटी स्पष्ट केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.