belgaum

क्रिकेट बॅटसाठी जमवलेल्या पैशातून स्मशानभूमीला गोवऱ्यांची मदत

0
569
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील सदाशिवनगर स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या गोवऱ्यांच्या खरेदीसाठी एका तरुण महिला क्रिकेटपटूने आपल्या बचतीचे पैसे दान केले आहेत. स्वतःसाठी नवीन क्रिकेट बॅट घेण्यासाठी जमा केलेली रक्कम तिने सामाजिक कार्यासाठी देऊन माणुसकीचा परिचय दिला आहे.

सदाशिवनगर स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी आवश्यक असणाऱ्या शेणाच्या गोवऱ्या लोकवर्गणीतून उपलब्ध करून दिल्या जातात.

याच उद्देशाने समाजसेवक गंगाधर पाटील आणि ॲलन विजय मोरे यांच्या पुढाकाराने आज गोवऱ्यांचे दान करण्यात आले. यावेळी गंगाधर पाटील यांची कन्या आणि क्रिकेटपटू निधी पाटील हिने देखील या उपक्रमात सहभाग घेतला.

 belgaum

निधी गेल्या दीड-दोन वर्षांपासून नवीन क्रिकेट बॅट खरेदी करण्यासाठी पैसे साठवत होती. मात्र, स्मशानभूमीतील गरजेबद्दल समजताच तिने स्वतःच्या इच्छेपेक्षा समाजसेवेला प्राधान्य दिले. तिने जमवलेले ३,८०० रुपये गोवऱ्यांच्या खरेदीसाठी सुपूर्द केले.

तिच्या या निर्णयामुळे उपस्थितांनी तिचे कौतुक केले. माजी महापौर आणि सामाजिक कार्यकर्ते विजय मोरे यांनी निधीच्या या दातृत्वाबद्दल प्रशंसोद्गार काढून तिला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.