belgaum

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचा लवकरच कायापालट : आम. सेठ

0
104
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचा सर्वांगीण विकास करून तिथे लवकरच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य आणि नवीन पुतळा बसवणार असल्याची ग्वाही उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांनी दिली आहे. जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘भीम गायन’ कार्यक्रमात ते बोलत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात आयोजित या विशेष सोहळ्याचे उद्घाटन आमदार आसिफ सेठ यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करून केले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेबांनी देशाला दिलेल्या संविधानामुळेच आज सर्व जाती-धर्मांना समान हक्क मिळाले असून, समाज बांधवांच्या मागणीनुसार येत्या वर्षभरात उद्यानातील विकासकामे पूर्ण करून नवीन पुतळा प्रस्थापित केला जाईल, असे आश्वासन आसिफ सेठ यांनी दिले. तसेच बाबासाहेबांचे बेळगावमधील वास्तव्य असलेल्या घराचे स्मारकात रूपांतर करण्याचा मानस आसिफ सेठ यांनी व्यक्त केला.

 belgaum

या सोहळ्याला अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होणकेरी, महानगरपालिका उपायुक्त उदयकुमार तळवार, जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे, समाज कल्याण विभागाचे सहायक संचालक रामनगौडा कन्नोळी, माहिती व जनसंपर्क विभागाचे सहायक संचालक गुरुनाथ कडबूर, सरकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बसवराज रायव्वगोळ, मल्लेश चौगुले यांच्यासह अनेक मान्यवर, विद्यार्थी आणि कलाकार या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.