belgaum

राज्य बार असोसिएशन निवडणूक मतदानासाठी बेळगावात उत्साह

0
275
 belgaum

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक राज्य बार असोसिएशन अर्थात कर्नाटक राज्य वकील संघटनेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण राज्यातील विविध जिल्ह्यांसह बेळगाव जिल्ह्यामध्ये आज बुधवारी मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यातील मतदानासाठी बेळगावच्या वकील समुदाय भवन न्यू कोर्ट कॉम्प्लेक्स येथे 7 मतदान केंद्रे (बूथ) उभारण्यात आली असून या ठिकाणी उत्साहात उत्स्फूर्त मतदान सुरू आहे.

सदर निवडणुकीसाठी यंदा 70,444 वकील मतदानास पात्र असून त्यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील 5,400 पात्र वकिलांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे यावेळी सर्वाधिक म्हणजे 68 उमेदवार बेंगलोर शहरातून रिंगणात उतरले आहेत.

बेळगाव जिल्ह्यातून ॲड. एस. एस. किवडसन्नावर, ॲड. विनय मांगलेकर ॲड. सुमिता पाटील, ॲड. चन्नबसप्पा बागेवाडी, ॲड. ईश्वर पाटील, ॲड. विनोद पाटील, ॲड. कलमेश किवड आणि ॲड. शिल्पा सौंदत्ती हे राज्य कार्यकारणीत जाण्यासाठी निवडणूक लढवत आहेत.

 belgaum

निवडणूक मतदानाच्या निमित्ताने आज सकाळपासून बेळगाव न्यायालय आवार वकिलांच्या गर्दीने फुलून गेले होते. वकील समुदाय भवन न्यू कोर्ट कॉम्प्लेक्स येथील सातपैकी बहुतांश मतदान मतदान केंद्रांच्या ठिकाणी आज सकाळपासून दुपारी भर उन्हात वकिलांचा मतदानासाठीचा उत्साह जाणवत होता. आजची सकाळी 9:30 वाजता सुरू झालेली मतदान प्रक्रिया सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहणार असून मतदानाच्या निमित्ताने जिल्ह्यातील सर्व वकील एकाच जागी उपस्थित असल्यामुळे निवडणूक रिंगणातील उमेदवार आजच्या अंतिम क्षणी स्वतःचा प्रचार करताना दिसत होते.

याप्रसंगी न्यायालय आवारात बेळगाव जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष म्हणून 6 वेळा उत्तम कामगिरी करणारे निवडणूक रिंगणातील उमेदवार ॲड. एस. एस. किवडसन्नावर यांनी बेळगाव लाईव्हशी बोलताना निवडणुकीबद्दल थोडक्यात माहिती दिली. त्यांनी सांगितले की, कर्नाटक राज्य वकील संघटना कार्यकारिणीच्या 25 सदस्य जागांपैकी 23 जागांसाठी ही निवडणूक होत आहे.

या जागांपैकी 18 जागा सर्वसामान्य उमेदवार आणि 5 जागा महिला वकिलांसाठी राखीव आहेत. राज्य वकील संघटना ही कर्नाटकातील महत्त्वाची संघटना आहे. आज होत असलेल्या मतदान प्रक्रियेत माझे सर्व वकील बंधू भगिनी सहभागी झाले आहेत कृपया वकिलांच्या हितरक्षणाच्या दृष्टिकोनातून चांगल्या योग्य अशा सक्षम उमेदवाराला मतदान करा, असे माझे त्यांना आवाहन आहे.

मी देखील निवडणुकीच्या रिंगणात असून सर्व जाती-धर्म, भाषेचे वकील मला पाठिंबा देतील याची मला खात्री असल्यामुळे मी या निवडणुकीत निश्चित विजय होईन, असा विश्वास ॲड. किवडसन्नावर यांनी व्यक्त केला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.