belgaum

तृतीयपंथीयांची भव्य रॅली केंद्र सरकारच्या २०२६ च्या ‘त्या’ वादग्रस्त विधेयकाची होळी

0
200
 belgaum

बेळगाव लाईव्ह : केंद्र सरकारच्या ‘लैंगिक अल्पसंख्याक हक्क संरक्षण सुधारणा विधेयक २०२६’ विरोधात बेळगावमध्ये तृतीयपंथीयांनी संतापाचा कडाका व्यक्त केला आहे.

राणी चन्नम्मा चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढलेल्या भव्य रॅलीद्वारे समुदायाने आपल्या अस्तित्वासाठी एल्गार पुकारला.

प्रस्तावित २०२६ चे विधेयक सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक ‘नाल्सा’ (NALSA) निकालाचा अवमान करणारे आहे. “हे विधेयक आमची स्व-ओळख आणि शरीराची स्वायत्तता हिरावून घेणारे असून, २०१७ च्या कर्नाटक राज्य धोरणाशी विसंगत आहे,” असा आरोप समुदाय नेत्यांनी केला आहे.

 belgaum

‘ट्रान्सजेंडर’ या शब्दाची व्याप्ती मर्यादित करून एका मोठ्या वर्गाला कायदेशीर संरक्षणापासून वंचित ठेवण्याचा हा डाव असल्याचा संताप यावेळी व्यक्त करण्यात आला.

वादग्रस्त विधेयक मागे घेऊन तृतीयपंथीयांना सन्मानाने जगू देणारे कायदे लागू करण्याची मागणी करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण कर्नाटक राज्यात उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनात जिल्ह्यातील तृतीयपंथीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सरकारचा निषेध केला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.