belgaum

सायबर फसवणुक संबंधित सुमारे 3 हजार म्यूल बँक खात्याचा छडा

0
189
Cop bgm
 belgaum

बेळगाव लाईव्ह :सायबर गुन्हेगारांविरुद्धच्या राज्यव्यापी कारवाईचा एक भाग म्हणून बेळगावच्या पोलिसांनी 2,992 म्यूल बँक खात्यांचा छडा लावला असून ज्यांचा वापर सायबर गुन्हेगारांनी बेकायदेशीर व्यवहार करण्यासाठी केला आहे. छडा लावलेल्या 72 खात्यांपैकी पहिल्या स्तरावरील खाती थेट फसवणुकीच्या व्यवहारांमध्ये वापरली जातात. पोलिसांनी आतापर्यंत 256 खात्यांसाठी केवायसी पडताळणी पूर्ण करून गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली.

एका इंग्रजी वृत्तपत्राला माहिती देताना पोलीस आयुक्त बोरसे यांनी सांगितले की तपासात म्यूल खाती मिळविण्यासाठी सायबर गुन्हेगार अनेक पद्धतींचा वापर करतात. एका प्रकरणात दुबईमध्ये काम करणाऱ्या महिलेला तिच्या मित्राने त्याला व्यवसायासाठी बँक खाते हवे असल्याचे सांगितले. मित्राला मदत करायची म्हणून तिने बेळगावमधील तिच्या आईला कर्मचाऱ्यांमार्फत खाते उघडण्यास सांगितले. ज्याचा नंतर सायबर फसवणुकीसाठी गैरवापर करण्यात आला. पोलिसांना असेही आढळून आले की फसवणूक करणाऱ्या काहींनी डार्कनेटद्वारे कमिशनच्या बदल्यात उघडपणे ऑनलाइन बँक खाती मागितली.

दुसऱ्या काही प्रकरणांमध्ये गावकऱ्यांच्या नावावर खाती भाड्याने घेतली जातात किंवा उघडली जातात. ज्यासाठी संबंधित गावकऱ्यांना मासिक पैसे मिळतात. मात्र त्यांना हे माहित नसते की खाती बेकायदेशीर व्यवहारांसाठी वापरली जात आहेत. दुसरी सामान्य युक्ती म्हणजे वर्क फ्रॉम होम अर्थात घरातून काम करण्याच्या खोट्या ऑफर. वर्क फ्रॉम होम करणाऱ्या व्यक्तींना पैसे हस्तांतरित करण्यासाठी किंवा पैसे हस्तांतरण, मोबाइल रिचार्ज किंवा कमिशनसाठी सबस्क्रिप्शन पेमेंट यासारखी कामे करण्यासाठी त्यांच्या बँक खात्यांचा वापर करण्यास सांगितले जाते आणि त्यानंतर ते फसवणुकीच्या जाळ्यात अडकतात.

 belgaum

बोरसे म्हणाले की, बँकांच्या अंतर्गत सूत्रांनी जास्त बॅलन्स असलेल्या ग्राहकांच्या खात्याची माहिती फसवणूक करणाऱ्यांना पुरवल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पोलिस बँकांवरही लक्ष ठेवून आहेत. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राशी समन्वय साधून राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये आता कडक देखरेख सुरू असल्याने गुन्हेगार त्यांचे लक्ष आता तक्रार प्रणाली तुलनेने कमकुवत असलेल्या सहकारी बँकांकडे वळवत आहेत.

पोलीस आयुक्तांनी चीन, थायलंड आणि कंबोडियासारख्या देशांमधून कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारांबद्दलही इशारा दिला. जेथील घोटाळे, फसवणूक करणारी केंद्रे उच्च पगाराच्या डेटा एंट्री नोकऱ्यांचे आश्वासन देऊन भारतीय तरुणांना भरती करतात.

भरती होताच त्या तरुणांचे पासपोर्ट जप्त केले जातात आणि त्यांना भारतीयांची ऑनलाइन फसवणूक करण्यास भाग पाडले जाते. बेळगाव पोलिसांनी आतापर्यंत अशा तीन पीडितांना वाचवले आहे. आम्ही काही खाजगी सायबर सुरक्षा संस्थांसह गोगेट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (जीआयटी) आणि अंगडी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (एआयटीएम) मधील अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांची देखील मदत घेत आहोत, अशी माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.