belgaum

फटाक्यांच्या अपघातग्रस्त शिवासाठी मदतीचा हात;

0
401
 belgaum

बेळगाव लाईव्ह :शहापूर येथील फटाक्यांच्या अपघातात डोळा गमावलेल्या शिवा लोहार याच्या मदतीसाठी समाजातील विविध स्तरांतून सहकार्याचा ओघ वाढत असून अनेकजण पुढे येत आहेत. या पार्श्वभूमीवर समाजसेविका माधुरी जाधव यांच्या माधुरी जाधव फौंडेशनच्या माध्यमातून श्रीमती अनुजा बाळेकुंद्री यांनी शिवा लोहार याला ११ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली.

दिवंगत पती सुभाष बाळेकुंद्री यांच्या स्मरणार्थ ही मदत देण्यात आली असून त्याचा धनादेश शिवा लोहार याला सुपूर्द करण्यात आला. या मदतीमुळे शिवाच्या पुढील उपचारांसाठी काहीसा दिलासा मिळाला आहे.

भारत-वेस्टइंडिज क्रिकेट सामन्यात भारताच्या विजयाचा आनंद साजरा करताना झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीत शिवा लोहार (वय ३२, रा. नवी गल्ली, शहापूर) गंभीर जखमी झाला होता. या दुर्घटनेत त्याचा एक डोळा निकामी झाला असून दुसरा डोळा वाचवण्यासाठी सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

 belgaum

भारतनगर परिसरातील लंबोदर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा सक्रिय कार्यकर्ता असलेला शिवा सध्या उपचार घेत आहे. त्याच्या उपचारासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतीची आवश्यकता असून नागरिकांनी शक्य ते सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

यावेळी समाजसेविका माधुरी जाधव (पाटील) व मंडळाचे अध्यक्ष पवन धामणेकर यांनी अनुजा बाळेकुंद्री यांचे आभार मानले. या प्रसंगी सत्यम कोनेरी, सुमित पाटील, शुभम पेवे, आकाश पाटील तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.