बेळगाव लाईव्ह :बेळगाव बार असोसिएशन बेळगावची सर्वसाधारण बैठक येत्या मंगळवार दि. 24 मार्च 2026 रोजी दुपारी 1 वाजता ॲडव्होकेट समुदाय भवन हॉल, पहिला मजला, ॲडव्होकेट समुदाय भवन, न्यू कोर्ट कॉम्प्लेक्स, बेळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे.
सदर बैठकीला वकील सदस्यांनी केएसबीसी किंवा बेळगाव बार असोसिएशन बेळगावने जारी केलेले ओळखपत्र सोबत घेऊन उपस्थित राहायचे आहे. सदर सर्वसाधारण बैठकीमध्ये पुढील विषयांवर चर्चा केली जाणार आहे. बेळगाव बार असोसिएशनच्या व्यवस्थापन समितीच्या 2026 ते 2028 या कालावधीसाठीच्या निवडणुकीवर चर्चा करणे आणि ती जाहीर करणे, तसेच त्याद्वारे कार्यक्रमांचे वेळापत्रक घोषित करणे.
व्यवस्थापन समितीने तात्पुरत्या स्वरूपात तयार केलेल्या बेळगाव बार असोसिएशनच्या मतदार यादीवर चर्चा करणे आणि ती प्रसिद्ध करणे. बेळगाव बार असोसिएशनच्या 2025 -26 या आर्थिक वर्षाकरिता हिशेबांची पडताळणी करण्यासाठी आणि लेखापरीक्षण अहवाल तयार करण्याच्या उद्देशाने सनदी लेखापालाची नियुक्ती करण्याबाबत चर्चा करणे.
असोसिएशनच्या 311 वकील/सदस्यांनी गेल्या दि. 12 फेब्रुवारी 2026 रोजी सादर केलेल्या विनंतीवर चर्चा करणे, ज्यामध्ये विहित वयोमर्यादा आणि वार्षिक सदस्यत्व वर्गणी शुल्कासंबंधी सुधारित उपविधींचा आढावा घेण्यासाठी सर्वसाधारण सभेला पटवून द्यावयाची आहे.
त्याचप्रमाणे बेळगाव बार असोसिएशन बेळगावच्या ज्या वकिलीनी आपल्या व्यवसायात 25 वर्षे पूर्ण केली आहेत आणि जे बेळगाव बार असोसिएशन बेळगावच्या 2026 -2028 या कालावधीच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून काम करण्यास इच्छुक आहेत, त्यांनी येत्या शुक्रवार दि. 20 मार्च 2026 रोजी किंवा त्यापूर्वी आपला अर्ज सादर करावा, असे आवाहन बेळगाव बार असोसिएशनचे सरचिटणीस ॲड. वाय. के. दिवटे यांनी केले आहे.





