belgaum

श्री चंद्रशेखर स्वामीजींची हत्या करणाऱ्यांसाठी कठोर शिक्षेची मागणी

0
409
 belgaum

बेळगाव :उत्तर प्रदेशातील मथुरा येथील श्री चंद्रशेखर स्वामीजी यांच्या हत्येस कारणीभूत असलेल्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बेळगावच्या कामधेनु अय्यप्पा सामाजिक सेवा संस्थेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

कामधेनु अय्यप्पा सामाजिक सेवा संस्थेतर्फे आज सोमवारी सकाळी उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहायकांनी निवेदनाचा स्वीकार करून पुढील योग्य त्या कार्यवाहीचे आश्वासन दिले. उत्तर प्रदेशातील मथुरा येथे गेल्या 21 मार्च 2020 रोजी श्री चंद्रशेखर स्वामीजींनी यांनी पाठलाग करून गाईची वाहतूक करणारे एक वाहन अडवले.

तसेच या पद्धतीने गोमातांना बेकायदा घेऊन जाऊन त्यांची हत्या करू नका अशी विनंती वाहनातील लोकांना केली. त्यावेळी झालेल्या जोरदार वादावादी नंतर गाईंची वाहतूक करणाऱ्यांनी स्वामीजींच्या अंगावर वाहन घालून त्यांना ठार मारले सदर श्री चंद्रशेखर स्वामीजी यानी आपले संपूर्ण आयुष्य गाईंचे संरक्षण आणि संवर्धनासाठी वेचले होते.

 belgaum

अशा व्यक्तीची हत्या झाल्यामुळे देशभरात दुःख व्यक्त होत आहे. तेव्हा संबंधित आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करून मृत स्वामीजींना न्याय मिळवून द्यावा, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.

निवेदन सादर केल्यानंतर कामधेनु अय्यप्पा सामाजिक सेवा संस्थेचे निलेश यांनी प्रसिद्धी माध्यमांना आपल्या मागणीबद्दल माहिती दिली. याप्रसंगी संस्थेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.