belgaum

बेळगावमध्ये कर्कश डीजे वाजवणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

0
626
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील आनंदवाडी परिसरात रंगपंचमीच्या कार्यक्रमात मर्यादेपेक्षा जास्त आवाजात डीजे वाजवून ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांवर टिळकवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रशासकीय नियमांचे उल्लंघन करून सार्वजनिक शांतता धोक्यात आणल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.

विकास मनोहर गवी आणि सुशांत विनोद शिंदे यांनी पूर्वपरवानगी न घेता ‘डॉक्सी साऊंड सिस्टम’चा वापर केल्याचे तपासात समोर आले आहे. पोलीस आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत आवाजाची पातळी १११.७६ डेसिबल इतकी धोकादायक आढळली. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि कर्नाटक पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

यासंदर्भात शहर पोलीस विभागाने परिपत्रक जरी केले असून ध्वनी प्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवून नागरिकांना नाहक त्रास देणाऱ्यांविरुद्ध शून्य सहनशीलता (Zero Tolerance) धोरण राबवले जात आहे.

 belgaum

बेळगावमधील कोणत्याही सार्वजनिक किंवा खासगी कार्यक्रमात ध्वनिक्षेपकाचा वापर करताना संबंधित विभागाची रीतसर परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

भविष्यातही नियमांचे उल्लंघन करून सार्वजनिक शांततेला बाधा पोहोचवणाऱ्यांवर अशाच प्रकारची कडक कारवाई सुरू राहील, असा इशारा बेळगाव शहर पोलीस आयुक्तांनी दिला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.