belgaum

हिरेबागेवाडी जवळील अपघातात कोडचवाडचे ग्रामपंचायत सदस्य ठार

0
589
Road accident logo
Road accident logo
 belgaum

बेळगाव लाईव्ह : खानापूर तालुक्यातील कोडचवाड येथील ग्रामपंचायत सदस्य, भाजपचे सक्रिय कार्यकर्ते तसेच सामाजिक कार्यकर्ते राजू गौडा पाटील यांचा बुधवारी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास हिरेबागेवाडी जवळ झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, राजू गौडा पाटील हे बुधवारी सकाळी आपल्या पत्नीसोबत दुचाकीवरून बेळगाव शहरात गेले होते. काम आटोपून ते दोघेही सायंकाळी आपल्या गावाकडे परतत असताना हिरेबागेवाडी गावाजवळ त्यांच्या दुचाकीला एका कारची जोरदार धडक बसली. धडकेमुळे राजू पाटील दुचाकीवरून खाली पडून महामार्गाच्या उजव्या बाजूला फेकले गेले.

याच वेळी मागून येणारी बस पुढे जात असताना बसच्या मागील चाकाखाली त्यांचे डोके आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.

 belgaum

या अपघातात त्यांच्या पत्नीला किरकोळ दुखापत झाली असून त्यांची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असल्याची माहिती मिळाली आहे.

राजू गौडा पाटील हे कोडचवाड ग्रामपंचायतीचे चार वेळा निवडून आलेले सदस्य होते. तसेच ते खानापूर तालुक्यात भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. सामाजिक कार्यातही त्यांचा मोठा सहभाग असल्याने त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, या घटनेची नोंद हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.