belgaum

बेळगावात महिला घरफोड्यांच्या टोळीचा पर्दाफाश

0
369
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील कॅम्प पोलीस ठाण्याच्या पथकाने घरफोडी करणाऱ्या दोन महिला आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून १५ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

या कारवाईमुळे शहरात चोरी करणाऱ्या टोळ्यांना पोलिसांन चांगलाच इशारा दिला असून, अवघ्या काही दिवसांत या गुन्ह्याचा छडा लावण्यात आला आहे.

या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, २८ जानेवारी २०२६ रोजी कॅम्प परिसरातील खानापूर रोडवरील रहिवासी सिलीन ऑस्कर डिसोझा यांनी त्यांच्या घरात चोरी झाल्याची तक्रार दिली होती.

या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास चक्रे वेगाने फिरवली. बेळगावचे पोलीस आयुक्त बोरासे भूषण गुलाबराव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगारांना पकडण्यासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले होते.

या विशेष तपास पथकाने तांत्रिक माहिती आणि गोपनीय सूत्रांच्या आधारे कामाक्षी संजय भोगे (वय ४५ वर्षे) आणि रमेजा अब्दुलमजीद बेपारी (वय ५७ वर्षे) या दोन महिलांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी सिलीन डिसोझा यांच्या घरात चोरी केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी त्यांच्याकडून १०२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले असून, त्यांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत सुमारे १५ लाख रुपये आहे. या कारवाईत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस पथकाचे पोलीस आयुक्तांनी विशेष कौतुक केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.