belgaum

सहकाऱ्याची बदनामी करण्यासाठी सरकारी अधिकाऱ्याचाच कट

0
1209
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव येथील एका महिला अधिकाऱ्याच्या घरात बल्ब होल्डरमध्ये छुपे कॅमेरे बसवून त्यांचे खासगी चित्रीकरण करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आपल्या बदलीचा सूड घेण्यासाठी एका सहकाऱ्यानेच हे कृत्य केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले असून मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे.

महिला अधिकाऱ्याच्या घरातील बल्ब होल्डरमध्ये छुपे कॅमेरे सापडल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास केला असता, एका सरकारी अधिकाऱ्यानेच हे षडयंत्र रचल्याचे उघड झाले असून माळमारुती पोलिसांनी या विकृत कृत्याचा पर्दाफाश केला आहे.

व्यावसायिक वैमनस्यातून महिला अधिकाऱ्याला समाजासमोर बदनाम करण्याच्या हेतूने हे कॅमेरे बसवण्यात आले होते. याप्रकरणी विनोद टी या सरकारी अधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केली असून त्याचे मोबाईल फोन पुढील तपासासाठी जप्त करण्यात आले आहेत.

 belgaum

आरोपीने काही बनावट पत्रकारांना हाताशी धरून महिला अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करण्याची तयारी केली होती. या ब्लॅकमेलिंगमधून मिळणाऱ्या रक्कमेत विनोद आणि त्या बनावट पत्रकारांची भागीदारी होती, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

पीडित महिला अधिकाऱ्याच्या वैयक्तिक आयुष्यातील खाजगी क्षण टिपण्यासाठी घरातील विविध बल्ब होल्डर्समध्ये एकूण ८ छुपे कॅमेरे पेरण्यात आले होते. संबंधित महिला अधिकारामुळेच आपली बदली झाल्याचा राग मनात धरून विनोदने हे पाऊल उचलल्याचे तपासात समोर आले आहे.

व्हिडिओच्या माध्यमातून महिला अधिकाऱ्याला जाळ्यात ओढण्याचा हा कट पोलिसांनी उधळून लावला आहे. या प्रकरणात आतापर्यंत तीन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या असून, पीडितेच्या कार्यालयातील आणखी एका संशयिताला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

ब्लॅकमेलिंगमधून मिळणाऱ्या पैशातून स्वतःचे घर बांधण्याचे आरोपीचे स्वप्न होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी सापळा रचून विनोद टी याला अटक केली असून त्याला न्यायालयासमोर हजर केले असता कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.