belgaum

प्रशिक्षण उड्डाणाला अपघात, दोघे बचावले

0
425
 belgaum

बेळगाव लाईव्ह : कलबुर्गीहून बेळगावकडे जात असलेले खासगी प्रशिक्षण विमान कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यात अपघातग्रस्त झाले. बबलेश्वर तालुक्यातील मंगळूर गावाजवळ हे विमान अचानक कोसळले. रविवारी हा अपघात घडला होता.

या अपघातात विमानातील दोन जण जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

प्राथमिक माहितीनुसार, हे विमान रेड बर्ड कंपनीचे प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे खासगी विमान होते. घटनेची माहिती मिळताच बबलेश्वर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताची कारणे तपासली.

महाराष्ट्राचे तत्कालीन माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघात होऊन काही दिवस उलटले असताना कलबुर्गीहून बेळगावकडे निघाले हे प्राशिक्षित विमान कोसळल्याची चर्चा सोशल मीडियावर आणि माध्यमातून जोरदारपणे रंगली होती.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.