belgaum

सुनील भातकांडे ठरला ‘गणेश श्री -कलखांब’ किताबाचा मानकरी

0
554
 belgaum

बेळगाव लाईव्ह :कलखांब (ता. जि. बेळगाव) येथे श्री गणेश मल्टीपर्पज को-ऑप सोसायटी लि.तर्फे पुरस्कृत आणि बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशन आयोजित बेळगाव जिल्हा पातळीवरील शरीर सौष्ठव स्पर्धेतील मानाचा ‘गणेश श्री -कलखांब’ हा किताब पॉलिहाइड्रोन जिमच्या सुनील भातकांडे याने पटकावला.

कलखांब येथील श्री गणेश मल्टीपर्पज को-ऑप सोसायटीच्या नूतन इमारतीच्या सभागृहात उपरोक्त स्पर्धा नुकतीच उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीरित्या पार पडली. विविध वजनी गटात घेण्यात आलेल्या या शरीर सौष्ठव स्पर्धेतील प्रत्येक गटातील विजेते स्पर्धक (अनुक्रमे पहिल्या पाच क्रमांक) पुढील प्रमाणे आहेत.

55 किलो गट : केतन भातकांडे (युनिव्हर्सल जिम), विनायक पथरोट (फ्लेक्स जिम), सोहन कांबळे (लाईफ टाईम फिट), अक्षय पाटील (हर्षा जिम गोकाक), कृष्णा हिरोजी (एसएसएस जिम). 60 किलो गट : उमेश गंगणे (फ्लेक्स मल्टी जिम), सागर कळ्ळीमनी (हर्षा जिम गोकाक), राजू मुचंडीकर (गोल्ड लाईफ जिम), संजय नार्वेकर (फ्लेक्स झोन), सुरज भंडारी (गोल्ड जिम). 65 किलो गट : विशाल निलजकर (फिट प्रो), अफताब किल्लेदार (गोल्ड लाईफ), अक्षय मुतगेकर (रॉ फिट), योगेश भडगावी (ए.एन. फिट), कार्तिक कांबळे (लाईफ टाईम). 70 किलो गट : प्रताप कालकुंद्रीकर (पॉलिहाइड्रॉन जीम), अथर्व यादव (आखाडा चिक्कोडी), सुहास दिवटे (एलिट फिट), तेजस जाधव (रॉ फिटनेस) नितेश गोरल (पॉलिहायड्रॉन जीम).

 belgaum

75 किलो गट : सुनील भातकांडे (पॉलिहाइड्रॉन जीम), स्वप्निल कपिलेश्वरी (मोरया जिम), लखन कांबळे (आखाडा जिम चिक्कोडी), संकेत सुरतेकर (एसआरएस फिट). 75 किलो वरील गट : गजानन काकतीकर (बाल हनुमान), हर्षद पाटील (रॉ फिट), किरण जाधव (रॉ फिट), युवराज पाटील (रॉ फिट). गणेश श्री -कलखांब : सुनील भातखंडे (पॉलिहायड्रोन जिम), उपविजेता -विशाल निलजकर (फिट प्रो).

सदर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ श्री गणेश मल्टीपर्पज को-ऑप सोसायटी लि.चे चेअरमन माजी नामवंत शरीर सौष्ठवपटू ‘बेळगाव श्री’ मनोहर हुक्केरीकर यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी कर्नाटक स्टेट बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे कार्यकारी अध्यक्ष व आंतरराष्ट्रीय शरीर सौष्ठव पंच अजित सिद्धनावर,

बेळगाव जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष एम. गंगाधर, सेवानिवृत्त रेल्वे अधिकारी मिस्टर इंडिया सुनील आपटेकर यांच्यासह श्री गणेश मल्टीपर्पज सोसायटीचे संचालक व इतर मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेसाठी पंच म्हणून अजित सिद्धनावर, एम. गंगाधर, सुनील आपटेकर, राजेंद्र चव्हाण, सुनील पवार, अनंत लंगरकांडे, सुनील राऊत, नूर मुल्ला व गजानन हंगीरगेकर यांनी काम पाहिले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.