belgaum

मिरवणुकीत हवेत गोळीबार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

0
46
cop borase
cop borase
 belgaum

बेळगाव लाईव्ह :सुळगा -हिंडलगा गावामध्ये श्री महालक्ष्मी मंदिर कळसारोहण मिरवणुकीप्रसंगी सार्वजनिक ठिकाणी आपल्या रिव्हॉल्वर मधून हवेत गोळीबार केल्याप्रकरणी भाऊराव गडकरी या व्यक्तीवर काकती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असल्याची माहिती बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली.

बेळगाव पोलीस आयुक्तालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. पोलीस आयुक्त बोरसे यांनी सांगितले की, गेल्या 5 जानेवारी रोजी सुळगा -हिंडलगा येथे श्री महालक्ष्मी देवीचा यात्रोत्सव सुरू होता.

त्यावेळी दुपारी मिरवणुकीप्रसंगी युवकांच्या दोन गटांमध्ये किरकोळ कारणावरून भांडण झाले. तेंव्हा स्थानिक गावकरी भाऊराव गडकरी यांनी परवाना असलेल्या आपल्या रिव्हॉल्वरमधून हवेत गोळीबार करत दोन गोळ्या झाडल्या.

सार्वजनिक ठिकाणी या पद्धतीने गोळीबार करणे बेकायदेशीर असल्यामुळे गडकरी याच्या विरुद्ध काकतीचे पोलीस उपनिरीक्षक मृत्युंजय मठद यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे बाबुराव गडकरी यांच्याकडील रिव्हॉल्वर तसेच तिच्यामधील चार जिवंत काडतुसे आणि काडतुशीच्या दोन रिकाम्या पुंगळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.

याखेरीज जप्त केलेल्या रिव्हॉल्वरचा परवाना रद्द करण्यात यावा या दृष्टीनेही कार्यवाही सुरू झाली आहे असे स्पष्ट करून सार्वजनिक ठिकाणी शक्ती प्रदर्शनासाठी आपल्याकडील परवाना अथवा बिगर परवाना शस्त्रांचा कोणी वापर केल्यास त्यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.