belgaum

18 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंद करण्याची मागणी

0
622
 belgaum

बेळगाव लाईव्ह : सध्याचा वाढता डिजिटल धोका लक्षात घेता 18 वर्षाखालील मुला-मुलींसाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याची विनंती वजा मागणी सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडवेकर आणि त्यांच्या टीमने अर्थात सहकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.

सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडवेकर आणि त्यांच्या टीमने उपरोक्त विनंतीचे निवेदन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना सादर केले आहे. आपल्या निवेदनात त्यांनी 18 वर्षांखालील मुलांना इंस्टाग्राम आणि फेसबुक सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या अनियंत्रित प्रवेशाबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

हे प्लॅटफॉर्म जितके कनेक्टिव्हिटी अर्थात त्वरित संपर्काचे माध्यम प्रदान करत असले तरी दुसरीकडे ते गंभीर गुन्हे आणि मानसिक हानी यासाठीचे प्रजनन केंद्र बनले आहेत. त्या अनुषंगाने आम्ही पुढील चिंताजनक मुद्द्यांकडे आपले लक्ष वेधू इच्छितो.

 belgaum

एआयचा चुकीचा वापर आणि मॉर्फिंग : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रगतीमध्ये “डीपफेक” थोडक्यात बनावट फोटो व्हिडिओ तयार करण्याचे प्रमाण वाढले आहे. ज्यामध्ये तरुण मुलींचे फोटो आणि व्हिडिओ चोरले जात आहेत आणि एआय वापरून अश्लील किंवा तडजोड करणारी सामग्री तयार केली जात आहे. यामुळे गंभीर ब्लॅकमेलिंग, सामाजिक लांछन आणि पीडित व त्यांच्या कुटुंबियांना दीर्घकालीन मानसिक आघात असे प्रकार घडत आहेत.

मानसिक आरोग्य आणि व्यसन: अवास्तव मानकांच्या सतत संपर्कामुळे अल्पवयीन मुलांमध्ये चिंता, नैराश्य आणि आत्मविश्वास कमी होत आहे. सायबरबुलिंग आणि सावज : भावनिक परिपक्वता असलेली मुले ऑनलाइन छळ आणि शोषणाचे सोपे लक्ष्य बनतात आहेत.

शैक्षणिक घसरण : रील्स आणि शॉर्ट फॉर्म कंटेंटचे व्यसन विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर होऊन त्यांच्या क्षमतेवर परिणाम करत आहे. ज्यामुळे शैक्षणिक दर्जात लक्षणीय घट होत आहे. एकंदर सध्या विशेषतः मुलींचे एआय-आधारित होत आहे. आमच्या मुलांची सुरक्षितता आणि भविष्य गैरगोष्टींच्या बाबतीत वेळेवर हस्तक्षेप करण्यावर अवलंबून आहे.

तेंव्हा आपण 18 वर्षांखालील व्यक्तींसाठी सोशल मीडिया वापरावर कडक नजर ठेवणाऱ्या धोरणाचे समर्थन करण्यासाठी प्रशासकीय कारवाई करावी. आपण आमच्या या विनंती वजा मागणीची गांभीर्याने दखल घ्याल ही अपेक्षा आहे, अशा आशयाचा तपशील अवधूत तुडवेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.