belgaum

संकेश्वरात 20 रोजी ‘छत्रपती श्री -2026’ आं. रा. शरीर सौष्ठव स्पर्धा

0
504
 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशन (बीडीबीबीए) आणि एनकेडीबीबीए यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शुक्रवार दि. 20 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता संकेश्वर (जि. बेळगाव) येथे ‘छत्रपती श्री -2026’ ही आंतरराज्य बेळगाव व कोल्हापूर जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा, तसेच ‘धर्मवीर श्री’ ही संकेश्वर गाव पातळीवरील टॉप -10 शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

सदर स्पर्धा संकेश्वर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे होणार आहे. छत्रपती श्री -2026 किताबाची स्पर्धा आयबीबीएफच्या नियमानुसार विविध 8 वजनी गटांमध्ये घेतली जाईल. स्पर्धेतील विजेत्यास 21,000 रु. आणि उपविजेत्यास 15,000 रुपयांच्या बक्षीशासह आकर्षक करंडक दिले जातील. बेस्ट पोझर किताब विजेत्यास 5000 रुपयांचे बक्षीस दिले जाईल.

याखेरीज प्रत्येक वजनी गटातील पहिल्या पाच क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे 5000, 4000, 3000, 2000, 2000 रुपयांची बक्षीसे दिली जातील. ‘धर्मवीर श्री’ या संकेश्वर गाव पातळीवरील टॉप -10 शरीर सौष्ठव स्पर्धेतील पहिल्या पाच क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे 5000, 4000, 3000, 2000, 2000 रुपयांचे बक्षीस देण्यात येईल.

 belgaum

तरी उपरोक्त स्पर्धांमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी अधिक माहितीसाठी अजित सिद्धनावर 9844063043, गंगाधर एम. 9845867230, हेमंत हावळ 9443143310, अक्षय खाडे 8883279777,

ओमकार मन्यागोळ 8884506352, संदीप भांबरे 9767967966, मारुती थोरात 8867941617, जयू कदम 8088437611, विकी मोरे 8618770715 अथवा ऋषी चव्हाण 9886142965 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.