belgaum

8व्या वेतन आयोगाच्या विरोधात बीएसएनएल पेन्शनधारकांचे आंदोलन

0
185
 belgaum

बेळगाव लाईव्ह : फेडरेशन ऑफ सेंट्रल पेन्शनर्स असोसिएशनच्या आवाहनानुसार केंद्र सरकारच्या नव्या वैधता अटी असलेल्या 8व्या वेतन आयोगाच्या विरोधात आज शुक्रवारी सकाळी बीएसएनएलच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे सत्याग्रह करून जोरदार निदर्शने करण्याद्वारे केंद्राला निवेदन सादर केले.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छेडण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये ऑल इंडिया बीएसएनएल डीओटी पेन्शनर्स असोसिएशन आणि ऑल इंडिया बीएसएनएल पेन्शनर वेल्फेअर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह बहुसंख्य सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. या सर्वांनी न्यायाची तसेच वैधता कायदा रद्द करण्याची मागणी करत जोरदार निदर्शने केली.

आंदोलनस्थळी प्रसिद्धी माध्यमांना माहिती देताना बीएसएनएल पेन्शनर्स असोसिएशनच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, नवनिर्मित फेडरेशन ऑफ सेंट्रल पेन्शनर्स असोसिएशनच्या आवाहनानुसार आम्ही आज धरणे आंदोलन करत आहोत. हे आंदोलन नव्या वैधता अटी असलेल्या 8व्या वेतन आयोगाच्या विरोधात आहे. त्यानुसार पेन्शनधारकांना त्या आठव्या वेतन आयोगापासून वंचित ठेवले जाईल.

म्हणून तो वैधता कायदा रद्द करण्यासाठी आम्ही आज धरणे आंदोलन करत आहोत. केंद्र सरकारच्या सर्व विभागांच्या पेन्शनधारकांना हा कायदा लागू आहे. तो वैधता कायदा रद्द केल्यास सर्व पेन्शन धारकांना 8व्या वेतन आयोगाचा फायदा होईल

त्यामुळे सदर वैधता कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी करून बीएसएनएलच्या बाबतीत बोलायचे तर आम्ही पेन्शनधारक तिसऱ्या वेतन आयोगाची मागणी करत आहोत, असे त्या पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.