belgaum

नाना शंकरशेट यांची २२३ वी जयंती

0
448
 belgaum

बेळगाव लाईव्ह – दैवज्ञ ब्राम्हण समाज शिक्षण संस्था व श्री सुवर्णलक्ष्मी को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने जगन्नाथ तथा नाना शंकरशेट यांची २२३ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सुवर्णलक्ष्मी सोसायटीचे व्हा. चेअरमन विजय सांबरेकर, दैवज्ञ ब्राम्हण समाज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वेर्णेकर, प्रमुख पाहुण्या म्हणून दैवज्ञ महिला मंडळच्या अध्यक्षा सौ. सुनंदा तेरगांवकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.


पाहुण्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन नानांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. सौ. मधुरा शिरोडकर यांनी स्वागत केले तर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वेर्णेकर यांनी प्रास्ताविक करत नानांच्या कार्याचा आढावा घेतला.


याप्रसंगी बोलताना विजय सांबरेकर म्हणाले की, “पिढीजात सुवर्णकार श्रीमंत घराण्यात जन्मलेल्या नानांनी समाजातील गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी वेळोवेळी शैक्षणिक व आर्थिक मदत केली. स्त्री शिक्षणाला प्राधान्य देवून नवीन शाळा व महाविद्यालयांची स्थापना केली. मुंबई शहराची जडणघडण करण्यात नानांचे मोठे योगदान आहे. मुंबई शहरात पहिली रेल्वे ही नानांच्या प्रयत्नांनी सुरु झाली.”

 belgaum

यावेळी संचालक समर्थ कारेकर,विनायक कारेकर, राजू बांदिवडेकर, माणिक सांबरेकर यांच्यासह प्रदीप अर्कसाली, देविदास काकतीकर, हेमंत मुतकेकर, दिपक अडकूरकर यांच्या सह संस्थेचे सभासद, कर्मचारी वर्ग व हितचिंतक उपस्थित होते. सौ. मधुरा शिरोडकर यांनी सुत्रसंचलन केले व विनायक कारेकर यांनी आभार मानले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.