belgaum

शेट्टर यांनी केंद्रासमोर पुन्हा मांडला नामांतर, हवाई संपर्काचा मुद्दा

0
168
 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी बेळगावचा हवाई संपर्क वाढवण्याच्या मुद्द्यासह विमानतळाचे नामांतर करण्याचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्र सरकारसमोर उपस्थित केला आहे.

दिल्लीत सध्या सुरू असलेल्या बजेट अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरकेंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांच्याशी काल मंगळवारी झालेल्या झालेल्या बैठकीत खासदार जगदीश शेट्टर यांनी मागणी केली आहे.

केंद्र सरकारला बेळगावहून मुंबई, चेन्नई, पुणे आणि सुरत यासारख्या प्रमुख शहरांसाठी एअर इंडियाची एक्सप्रेस सेवा सुरू करण्याची विनंती खासदारांनी केली. त्यांनी या संदर्भात औपचारिक विनंती पत्र देखील सादर केले.

 belgaum

अशाच प्रकारच्या निवेदनांद्वारे यापूर्वी उपस्थित केलेल्या चिंता त्यांनी काल पुन्हा व्यक्त केल्या. खासदार शेट्टर यांनी बेळगाव विमानतळांचे दीर्घकाळ प्रलंबित नामकरण जलद करण्याचा आग्रह धरताना बेळगाव विमानतळाचे कित्तूर राणी चन्नम्मा विमानतळ,

हुबळीचे क्रांतीवीर संगोळी रायण्णा विमानतळ, विजयपुराचे जगज्योती बसवेश्वर विमानतळ आणि शिमोगा येथील विमानतळाचे राष्ट्रकवी डॉ. के. व्ही. पुट्टप्पा (कुवेम्पू) विमानतळ असे नामकरण करण्याचा प्रस्ताव मांडला

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.