belgaum

मराठा विकास महामंडळाला हजार कोटींचा निधी द्या

0
211
Kiran jadhav
 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक राज्यातील शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष प्राधान्य देत कर्नाटक मराठा समाज विकास महामंडळाला किमान एक हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा, अशी मागणी मराठा नेते किरण जाधव यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे केली आहे.

याबाबत प्रसिद्धीपत्रकाद्वारे त्यांनी सांगितले की, सध्या महामंडळाला दिला जाणारा निधी समाजाच्या गरजांच्या तुलनेत अपुरा आहे. सामाजिक न्यायाला प्राधान्य देणारे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात अधिक तरतूद करून महामंडळामार्फत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य, परदेशी शिक्षणासाठी मदत तसेच शेती व पशुसंवर्धन क्षेत्रातील उपक्रमांना चालना देणाऱ्या विशेष योजना राबवाव्यात.

Kiran jadhav

तसेच, समाजातील बेरोजगार युवकांना कमी व्याजदरात कर्जसुविधा उपलब्ध करून देत स्वयंपर रोजगाराला प्रोत्साहन देणाऱ्या कार्यक्रमांना प्राधान्य द्यावे, अशीही त्यांनी मागणी केली.

राज्यातील मराठा समाज आजही शिक्षण व आर्थिक क्षेत्रात अनेक अडचणींचा सामना करीत आहे. त्यामुळे येत्या अर्थसंकल्पात समाजाच्या अपेक्षांना प्रतिसाद देत मराठा विकास महामंडळासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे, असे आवाहन किरण जाधव यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.