बेळगाव लाईव्ह :डिफेन्स सिक्युरिटी कॉर्प्स (डीएससी) मध्ये नावनोंदणीसाठी बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे सेवानिवृत्त जवानांसाठी येथे दि. 16 व दि. 17 मार्च 2026 रोजी भरती मेळावा आयोजित केला जाणार आहे.
सदर मेळावा केवळ मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटमध्ये सेवा दिलेल्या नियमित सैन्य/टीएच्या माजी सैनिकांसाठी खुला आहे. पात्र उमेदवारांचे चारित्र्य हे आदर्शवत किंवा खूप चांगले असले पाहिजे. उमेदवाराने शेप-1 वैद्यकीय मानके पूर्ण केली असावीत.
तसेच सेवा अटी पूर्ण केल्यानंतर त्याला सेवानिवृत्ती मिळालेली हवी. सोल्जर जीडीसाठी वय 46 वर्षांपेक्षा कमी आणि सोल्जर क्लर्कसाठी 48 वर्षांपेक्षा कमी असावे. पुनर्नोंदणी मागील सेवेतून निवृत्त झाल्याच्या 2 वर्षांच्या आत (जीडी) आणि 5 वर्षांच्या आत (क्लर्क) असावी.
मेळाव्यादरम्यान एकत्रित शारीरिक चांचणीसाठी उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रांसह, कॉम्बॅट ड्रेस आणि डीएमएस शूजसह दि. 16 मार्च 2026 रोजी सकाळी 8 वाजता मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगाव येथे हजर राहावे, कसे आवाहन करण्यात आले आहे.




