belgaum

हातभट्टीची दारू विकणारा पोलिसांच्या ताब्यात

0
246
Cop bgm
 belgaum

बेळगाव लाईव्ह :मोदगा -सुळेभावी रस्त्याशेजारी सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू विकणाऱ्या एकाला मारीहाळ पोलिसांनी काल अटक केली.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव आनंद अप्पय्या कलेरी (वय 26, रा. मारुती गल्ली खनगाव, सध्या मोदगा ता. जि. बेळगाव) असे आहे. आनंद हा काल शुक्रवारी विठ्ठल हनबर लेआउट जवळ मोदगा -सुळेभावी रस्त्याशेजारी स्वतःच्या लाभासाठी हातभट्टीच्या बेकायदेशीर दारूची विक्री करत होता.

याबाबतची माहिती मिळताच मारीहाळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जीएस दरूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाड टाकून आनंद कलेरी याला रंगेहात पकडले. तसेच त्याच्या जवळील 5 लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली. याप्रकरणी मारीहाळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.