बेळगाव लाईव्ह : गावातील प्रवाशांच्या सोयीसाठी जटगे येथील काही युवकांनी पुढाकार घेत बसस्टॉप शेडची उभारणी केली आहे. उन्हाळा व पावसाळ्यात बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा दिलासा मिळणार असून या उपक्रमातून युवकांनी समाजाप्रती आपली जबाबदारी आणि सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे.
याचबरोबर गावाचे आराध्य दैवत असलेल्या श्री सिद्धेश्वर मठ देवस्थान, जटगे येथे दरवर्षी महाशिवरात्रीच्या पावन दिवशी मोठी यात्रा भरते. पंचक्रोशीतील हजारो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. मंदिराचे प्रवेशद्वार स्पष्ट दिसावे तसेच ये-जा करणाऱ्या भाविकांना मार्ग सुस्पष्टपणे जाणवावा, या उद्देशाने युवकांनी स्वतःच्या खर्चातून “श्री सिद्धेश्वर मठ देवस्थान, जटगे” नावाची भव्य कमान उभारली आहे.
हा उपक्रम केवळ कामापुरता मर्यादित नसून गावाविषयीची आपुलकी, सेवाभाव आणि सामाजिक जाणीव यांचे प्रतीक ठरत आहे. या कार्याबद्दल गावकऱ्यांतून समाधान व्यक्त होत असून संबंधित युवकांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
या उपक्रमासाठी पुढील युवकांनी योगदान दिले :
मारुती महाबळेश्वर तिनेकर,
अंकुश बळीराम मळीक,
ज्योतिबा विठ्ठल मळीक,
युवराज छत्रुघन मळीक,
संतोष नारायण पाटील,
सागर वामन पाटील,
म्हात्रू मल्लू पाटील,
पुंडलिक परशराम तिनेकर,
मारुती शिवाजी तिनेकर,
मिथुन मल्लू पाटील,
सागर चंद्रकांत पाटील,
पवन पाटील आदी युवकांनी या समाजोपयोगी कार्यात सक्रिय सहभाग घेतला.
या उपक्रमामुळे जटगे गावात युवकांच्या सामाजिक जाणिवेचे व सेवाभावाचे सकारात्मक चित्र समोर आले आहे.



