belgaum

हिरेबागेवाडी पोलिसांकडून एका मटका बुकिला अटक

0
441
Police logo
 belgaum

बेळगाव लाईव्ह : के.के. कोप्प (ता.जि. बेळगाव) गावाच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी मटका जुगाराचा अड्डा चालवणाऱ्या एका मटका बुकीला हिरेबागेवाडी पोलिसांनी काल शुक्रवारी अटक केली.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव वीरप्पा नागप्पा मडगली (वय 46, रा. मारुती मंदिराजवळ, नावलगट्टी ता. बैलहोंगल जि. बेळगाव) असे आहे.

आरोपी वीरप्पा हा के.के. कोप्प गावाच्या हद्दीत नागेरहाळकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारी सार्वजनिक ठिकाणी काल कल्याण मटका या जुगारावर लोकांचे पैसे लावत होता.

त्यावेळी हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश यरगोप्प व त्यांच्या सहकाऱ्यांनी छापा टाकून वीरप्पा याला रंगेहाथ अटक केली. तसेच त्याच्या जवळील रोख 750 रुपये आणि मटक्याचा चिठ्ठ्या जप्त केल्या. या प्रकरणी हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात पुन्हा नोंद झाला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.