belgaum

लग्न समारंभात हरवलेली अडीच लाखांची सोन्याची चैन परत

0
738
 belgaum

बेळगाव लाईव्ह : लग्नसमारंभातील गडबडीत हरवलेली सुमारे अडीच लाख रुपये किमतीची १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन उद्यमबाग पोलिस स्थानकाच्या पोलिसांनी अवघ्या काही तासांत शोधून संबंधित महिलेला परत दिली.

बेळगाव शहरातील उद्यमबाग पोलिस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या शगुन गार्डन येथे आयोजित लग्नसमारंभाला उपस्थित असलेल्या कु. सुनीता गोपाळ नारायणकर, रा. शाहू नगर, बेळगाव यांची सुमारे २,५०,००० रुपये किमतीची सोन्याची चैन हरवली होती. याबाबत त्यांनी तात्काळ उद्यमबाग पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली.

घटनेची गंभीर दखल घेत पोलिस निरीक्षक डी. के. पाटील यांनी गुन्हे शाखेचे पीएसआय श्री पी. जी. गंडव्वगोळ व त्यांच्या पथकाला तत्काळ घटनास्थळी पाठवले. लग्नस्थळी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची बारकाईने तपासणी करण्यात आली. तपासाच्या आधारे अवघ्या काही तासांतच १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन हस्तगत करण्यात आली.

 belgaum

सदर चैन कु. सुनीता नारायणकर यांना परत देण्यात आली असून त्यांनी पोलिसांच्या तत्परतेबद्दल समाधान व्यक्त केले.

या कारवाईत पी. जी. गंडव्वगोळ यांच्यासह तवनप्पा बी. कुंचनूर (सीएचसी ११७८), मल्लिकार्जुन एल. पात्रोट (सीपीसी १५२९) आणि ईरन्ना चिवलगी (सीपीसी १७८१) यांनी सहभाग घेतला. त्यांच्या कार्याचे पोलीस आयुक्त, उपपोलीस आयुक्त (का. व सु.), उपपोलीस आयुक्त (आ.वि.) तसेच खडेबाजार उपविभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी कौतुक केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.