belgaum

गोवा बनावटीच्या दारूची अवैध विक्री करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

0
276
Cop bgm
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अवैध मद्यविक्री आणि सार्वजनिक ठिकाणी मद्य सेवन करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कडक मोहीम राबवली आहे. उद्यमबाग आणि बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने दोन स्वतंत्र कारवायांमध्ये आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे.

उद्यमबाग पोलिसांनी वाघवडे येथील परमेश्वर नायक याला गोवा बनावटीच्या दारूची विक्री करताना रंगेहात पकडले. आरोपीकडून विविध कंपन्यांच्या मद्याच्या बाटल्या आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली असून त्याच्यावर अबकारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे किरण होदकट्टी यांनी सांगितले.

दुसऱ्या कारवाईत बेळगाव ग्रामीण पोलिसांनी राजहंसगड किल्ला परिसरात सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे मद्यसेवन करणाऱ्या सातेरी ओऊळकर याला ताब्यात घेतले. सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी त्याच्यावर अबकारी कायद्यानुसार कारवाई करण्यात आल्याची माहिती लक्कप्पा जोडट्टी यांनी दिली.

पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांनी या यशस्वी मोहिमेबद्दल दोन्ही पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. अवैध धंद्यांविरोधात भविष्यातही अशाच प्रकारची कठोर कारवाई सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.