belgaum

पोलिसांच्या कारवाईत गांजा सेवन करणाऱ्या पाच तरुणांना अटक

0
550
Cop bgm
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर आणि ग्रामीण पोलिसांनी अमली पदार्थ व अवैध मद्यप्राशना विरोधात धडक मोहीम राबवून सात जणांना अटक केली आहे. १६ फेब्रुवारी रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत गांजा सेवन करणारे पाच तरुण आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या दोघांना रंगेहात पकडण्यात आले.

बेळगाव ग्रामीण पोलिसांनी सावगाव तलावाजवळ सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या जोतिबा बसरीकु आणि पंकज चौगुले या दोघांना ताब्यात घेतले. मच्छे आणि सावगाव परिसरात अमली पदार्थांच्या नशेत वावरणाऱ्या शिवानंद करनायक आणि शिवनगौडा गौडर या दोघांना पोलिसांनी अटक केली.

माळमारुती पोलिसांनी ऑटो नगर, रामतीर्थ नगर आणि कणबर्गी भागात कारवाई करत श्रवण सुंटकर, आदित्य पीरगण्णवर आणि ओमकार हिरोजी या तिघांना गांजा सेवन केल्याप्रकरणी अटक केली.

या कारवाईत संतोष दळवाई, लक्ष्मण जोडट्टी, नागगौडा कण्णमरीगौडा, होन्नप्पा तलवार, श्रीशैल हुलगेरी यांचा सहभाग होता. या विशेष मोहिमेत एकूण सात आरोपींना गजाआड करण्यात आले असून, पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी संबंधित पोलीस पथकांचे कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.