belgaum

बेळगाव शहरात आता धावणार १०० पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बसेस

0
633
Iranna kadadi
राज्यसभा सदस्य इरान्ना कडाडी बेळगाव बेळगाव विमान तळाची मांडली व्यथा...
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहराच्या परिवहन सेवेचे आधुनिकीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने १०० नवीन इलेक्ट्रिक बसेस मंजूर केल्या आहेत.

खासदार इराण्णा कडाडी यांनी दिल्लीतील अर्थसंकल्पीय अधिवेशनात केलेल्या पाठपुराव्यामुळे बेळगावच्या सार्वजनिक वाहतुकीला ही मोठी रसद मिळाली असून, प्रदूषणमुक्त प्रवासासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

संसदेत खासदार इराण्णा कडाडी यांनी विचारलेल्या प्रश्नावर केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री तोखन साहू यांनी सविस्तर माहिती दिली. बेळगावमधील बस डेपोच्या सिव्हिल कामांसाठी आणि आधुनिकीकरणासाठी ६.८५ कोटी रुपयांचा स्वतंत्र निधी केंद्राने उपलब्ध करून दिला आहे. राज्यातील एकूण १० शहरांमध्ये ७५० इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी ७७ कोटींहून अधिक रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे तोखन साहू यांनी स्पष्ट केले.

 belgaum
Iranna kadadi
Iranna kadadi

शहरातील रस्ते विकासाबाबत प्रसिद्धीपत्रकाद्वारे खासदार कडाडी यांनी माहिती दिली आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत १२ किमीहून अधिक लांबीचे अद्ययावत रस्ते तयार झाले आहेत. विशेषतः सायकल ट्रॅक आणि पादचारी मार्गांवर भर देण्यात आला आहे.

याशिवाय, शहराबाहेरून जाणारा रिंग रोड प्रकल्प आता वेग घेणार असून, पहिल्या टप्प्याची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. लवकरच उर्वरित टप्प्यांचा अहवाल तयार करून हा प्रकल्प पूर्णत्वास नेला जाईल, असा विश्वास खासदार इराण्णा कडाडी यांनी व्यक्त केला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.