belgaum

‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’प्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

0
1227
 belgaum

बेळगाव लाईव्ह : हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’मुळे एका व्यक्तीचा बळी गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मद्यधुंद अवस्थेत भरधाव कार चालवून एका दुचाकीस्वाराला चिरडणाऱ्या चालकाविरोधात पोलिसांनी आता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

राष्ट्रीय महामार्गावर हलगा गावाजवळ हा भीषण अपघात घडला. आरोपी प्रसाद मार्ला याने दारूच्या नशेत आपली कार (MH 11 CW 9495) भरधाव वेगाने चालवत समोरून जाणाऱ्या देवेंद्र चौगुले यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.

या अपघातात गंभीर जखमी झालेल्या चौगुले यांना तातडीने बिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, गुरुवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

 belgaum

अपघातानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र महामार्ग गस्ती पथकाने पाठलाग करून त्याला पकडले. सदर कारचालकाची पासणी केली असता चालक दारूच्या नशेत असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी हिरेबागेवाडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध १०५ बीएनएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुंद्रेश होळ्ळेण्णवर आणि त्यांच्या पथकाने केलेल्या या तत्पर कारवाईचे बेळगाव पोलीस आयुक्तांनी विशेष कौतुक केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.