belgaum

पोलिसांच्या कारवाईत क्रिकेट बेटिंगसह जुगार अड्ड्यांवर छापा

0
824
cop borase
cop borase
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर आणि ग्रामीण भागात पोलिसांनी अवैध धंद्यांविरुद्ध विशेष मोहीम राबवून मोठी कारवाई केली आहे. सीसीबी आणि ग्रामीण पोलिसांनी केलेल्या विविध कारवायांमध्ये क्रिकेट बेटिंग, जुगार आणि अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या ११ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून रोकड जप्त करण्यात आली आहे.

बेळगाव सीसीबी विभागाने उद्यमबाग परिसरात केलेल्या कारवाईत विश्वचषक क्रिकेट सामन्यांच्या निकालावर लोकांकडून पैसे घेऊन बेटिंग घेणाऱ्या पंकज दिलीप नारायणकर (२१, रा. बाशबान गल्ली) याला पोलिसांनी अटक केली.

त्याच्याकडून ४० हजार ५०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. दुसरी कारवाई बेळगाव ग्रामीण पोलिसांनी येळ्ळूर-अनगोळ रस्त्यावरील मोकळ्या जागेत सुरू असलेल्या ‘अंदर-बाहेर’ जुगारावर केली. या धाडीत विनय मोरे, राज मापनकर, रोहित चौधरी यांच्यासह नऊ जणांना ताब्यात घेऊन २७ हजार ९६० रुपये जप्त केले.

तिसऱ्या घटनेत, हिरेबागेवाडी पोलिसांनी बस्तवाड परिसरात गांजाचे सेवन करून अस्वाभाविक वर्तन करणाऱ्या समेद नेमिनाथ पाटील (२०) या तरुणाला अटक केली. वैद्यकीय चाचणीनंतर त्याने अमली पदार्थांचे सेवन केल्याचे स्पष्ट झाले असून त्याच्यावर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकाच दिवसात ११ आरोपींना जेरबंद करून ६८ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करणाऱ्या पोलीस पथकाचे शहर पोलीस आयुक्त आणि पोलीस उपआयुक्तांनी कौतुक केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.