belgaum

‘बेलकॉन २०२६’ प्रदर्शनाचे शानदार उद्घाटनघर खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी;

0
407
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील सीपीएड मैदानात उत्तर कर्नाटकातील सर्वात मोठे आणि प्रतिष्ठित रिअल इस्टेट प्रदर्शन ‘क्रेडाई बेलकॉन २०२६’चा आज मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. डीसीसी बँकेचे संचालक राहुल जारकीहोळी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले, तर सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने या सोहळ्याला विशेष उपस्थिती लावत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आमदार आसिफ सेठ, आमदार चन्नराज हट्टीहोळी आणि क्रेडाई कर्नाटकचे अध्यक्ष भास्कर नागेंद्रप्पा यांची प्रमुख उपस्थिती होती. बांधकाम क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान आणि बेळगावच्या बदलत्या रूपाचे दर्शन या प्रदर्शनातून घडत आहे.

बेलकॉनच्या व्यासपीठावरून बोलताना आमदार आसिफ सेठ म्हणाले की, शहराच्या विस्तारासाठी आणि नागरिकांना आधुनिक सुविधा मिळवून देण्यासाठी बेलकॉनसारखे उपक्रम महत्त्वाचे आहेत. बेळगावचा विकास हा सरकारच्या प्राधान्यक्रमावर असून, अशा नाविन्यपूर्ण प्रयत्नांना आमचे नेहमीच सहकार्य असेल, असे त्यांनी नमूद केले.

 belgaum

बेळगाव शहर हे सध्या गुंतवणुकीचे केंद्र बनत असल्याचे आमदार चन्नराज हत्तीहोळी यांनी सांगितले. रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी बेळगाव हे सुरक्षित आणि फायदेशीर शहर असून, गुंतवणूकदारांना पोषक वातावरण उपलब्ध करून देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन त्यांनी केले.

उद्घाटक राहुल जारकीहोळी यांनी आयोजकांचे कौतुक करताना म्हटले की, अशा प्रकारचे जागतिक दर्जाचे प्रदर्शन बेळगावात भरल्यामुळे स्थानिक नागरिकांना घरांची माहिती घेण्यासाठी आता इतर मोठ्या शहरांत जाण्याची गरज उरलेली नाही. बेळगावमधील वाढत्या उद्योगांच्या पार्श्वभूमीवर हे प्रदर्शन अत्यंत समयोचित आहे.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने बेळगावबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. गेल्या दशकात बेळगावात झालेली प्रगती विस्मयकारक आहे. घर हे प्रत्येकाच्या स्वप्नाचा विषय असतो आणि बेलकॉनच्या माध्यमातून एकाच ठिकाणी सर्व पर्याय उपलब्ध करून देणे ही अभिनंदनीय बाब आहे, अशी प्रतिक्रिया तिने व्यक्त केली.

बेलकॉनचे अध्यक्ष प्रशांत वांडकर यांनी सांगितले की, यंदाच्या प्रदर्शनात भव्य स्टॉल्स आणि विविध गृहप्रकल्पांची माहिती देण्यात आली आहे. या माध्यमातून बांधकाम क्षेत्रात मोठी आर्थिक उलाढाल अपेक्षित असून ग्राहकांना बांधकामाशी संबंधित सर्व साहित्य व मार्गदर्शन एकाच छताखाली मिळत आहे.

चार दिवसांच्या या प्रदर्शनात बांधकाम व्यावसायिक, आर्किटेक्ट्स आणि बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करत आहेत. यश इव्हेंट्सचे प्रकाश कालकुंद्रीकर यांच्या सहकार्याने या सोहळ्याचे नेटके नियोजन करण्यात आले आहे. एसबीआयसारख्या बड्या बँकांनीही या प्रदर्शनात सहभाग घेतल्याने घर खरेदी इच्छुकांसाठी गृहकर्जाची प्रक्रिया सुलभ झाली आहे

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.