belgaum

गांजासेवन, मटका बुकीसह घातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी संशयितांना अटक

0
384
Cop bgm
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर पोलिसांनी गुन्हेगारी कारवायांना लगाम घालण्यासाठी शहरात विविध ठिकाणी धडक मोहीम राबवून एकूण ४ आरोपींना जेरबंद केले आहे. खडेबाजार, माळमारुती आणि मार्केट पोलीस ठाण्याच्या पथकांनी ही कारवाई केली असून, पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी या कामगिरीचे कौतुक केले आहे.

खडेबाजार पोलीस ठाण्याचे एएसआय चिन्नस्वामी आणि त्यांच्या पथकाने पाटील माळ गल्ली परिसरात केलेल्या कारवाई अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी संशयास्पदरीत्या वावरणाऱ्या उत्कर्ष सुनील वर्मा (२४, रा. शास्त्री नगर) याला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी केली असता, त्याने गांजा सेवन केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यावर अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने धारदार घातक शस्त्र बाळगणाऱ्या फारुख रेहमान चज्जू (३५, रा. सुभाष नगर) याला माळमारुती पोलिसांनी अटक केली आहे. अशोक नगर हायवे अंडरपास जवळ पीएसआय होन्नप्पा तलवार आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपीकडून घातक लोखंडी शस्त्र जप्त करण्यात आले असून, त्याच्यावर शस्त्र कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मार्केट पोलीस ठाण्याचे पीएसआय विठ्ठल हावन्नवर यांनी खंजार गल्ली येथील एका मटका अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी जुगार खेळवून लोकांकडून पैसे घेणाऱ्या रियाज अब्दुलरेहमान घीवाले (४६) आणि अशोक बाबू जाधव (५८) या दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणातील मुख्य संशयित फाहिम कोतवाल याचा पोलीस शोध घेत आहेत.

या तिन्ही कारवायांबद्दल पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी पथकाचे कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.