belgaum

अंजलीताईना मिळाले काँग्रेसचे हे पद

0
791
ANjalitai nimbalkar
 belgaum

बेळगाव लाईव्ह :काँग्रेस अध्यक्षांनी गोव्याच्या प्रभारी असलेल्या एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांना पुडुचेरी मधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एआयसीसी सचिव पदाशी संलग्न पुडुचेरीच्या प्रभारी सचिव म्हणून अतिरिक्त जबाबदारी सोपवली आहे.

काँग्रेस अध्यक्षांनी मयूर जयकुमार यांना कर्नाटकच्या प्रभारी सरचिटणीसपदी असलेल्या एआयसीसी सचिवपदावरून मुक्त केले असून त्यांना तात्काळ प्रभावाने ओडिसाचे प्रभारी म्हणून एआयसीसी सचिवपदाची जबाबदारी सोपवली आहे.

अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी आपल्या अधिकृत पत्रकाद्वारे उपरोक्त माहिती प्रसिद्धीस दिली आहे.

 belgaum

दरम्यान, पुडुचेरीच्या (पूर्वीचे पाँडिचेरी)  प्रभारी सचिव म्हणून अतिरिक्त जबाबदारी सोपवल्याबद्दल गोव्याच्या प्रभारी असलेल्या एआयसीसी सचिव व खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी काँग्रेस नेतृत्वाचे आभार मानले आहेत.

ANjalitai nimbalkar

आपल्यावर विश्वास दाखवल्याबद्दल एआयसीसी अध्यक्ष खर्गे, सीपीपी सोनिया गांधी, विरोधी पक्षनेते व खासदार राहुल गांधी आणि एआयसीसी महासचिव व खासदार के. सी. वेणुगोपाल यांच्याबद्दल डॉ. निंबाळकर यांनी विशेष आभार प्रकट केले आहेत. आयएनसी तामिळनाडू आणि पुडुचेरीचे प्रभारी गिरीश चौडणकर यांनी आपल्यावर विश्वास ठेवल्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार मानले आहेत.

तसेच आपल्यावर सोपवलेली जबाबदारी आपण अत्यंत प्रामाणिकपणे समर्पण आणि वचनबद्धतेने पार पाडण्यासाठी कठोर परिश्रम घेण्याद्वारे संघटनेच्या सेवेत आपले सर्वोत्तम देऊ, असा विश्वास डॉ. अंजली निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.