belgaum

धामण्यातील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या तक्रारीची मुख्यमंत्र्यांकडून दखल

0
1057
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील धामणे (एस) येथील शेतकऱ्यांनी रस्त्याच्या जागेवर झालेल्या बेकायदेशीर अतिक्रमणाबाबत केलेल्या तक्रारीची मुख्यमंत्री सचिवालयाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी करून नियमानुसार तात्काळ कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांच्या विशेष कर्तव्यदधिकाऱ्यांनी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

धामणे येथील सर्व्हे नंबर ७८१ मधील सार्वजनिक रस्त्याच्या जागेत ग्रामविकास अधिकाऱ्याने कायद्याचे उल्लंघन करून संगणकीय उताऱ्याची नोंद केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता. कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय आणि बाजूच्या शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय हा परवाना देण्यात आल्याने सार्वजनिक रस्ता बंद झाला असून, शेतकरी व गुराढोरांच्या येण्या-जाण्याचा मार्ग खुंटला आहे.

याप्रकरणी संतप्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे धाव घेत दाद मागितली होती. मुख्यमंत्र्यांच्या विशेष कर्तव्यदधिकाऱ्यांनी या अर्जाची दखल घेत ३१ जानेवारी २०२६ रोजी प्राप्त झालेल्या तक्रारीवर ४ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र धाडले आहे. या पत्राद्वारे प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 belgaum

यल्लप्पा रामा बेळगावकर यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आहे. दोषी ग्रामविकास अधिकाऱ्यावर कठोर शिस्तभंगविषयक कारवाई करावी आणि बेकायदेशीरपणे तयार करण्यात आलेला संगणकीय उतारा रद्द करून रस्ता पूर्ववत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. आता जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.