belgaum

बेळगावात झीमर झेड8 तंत्रज्ञानाद्वारे पहिली रोबोटिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया

0
440
 belgaum

बेळगाव लाईव्ह :एमएम जोशी -कोडकणी सुपर स्पेशालिटी आय सेंटर या आधुनिक नेत्र रुग्णालयाने बेळगावमध्ये जागतिक विकसित नेत्र उपचार तंत्रज्ञान आणले आहे. तसेच त्यांच्या डॉ. शिल्पा कोडकणी आणि सहकाऱ्यांनी फेम्टो सेकंड लेसर अँड क्लियर (कॉर्नियल लेंटिक्युल एक्सट्रॅक्शन फॉर ॲडव्हान्स्ड रिफ्रॅक्टिव्ह करेक्शन) शस्त्रक्रियेद्वारे चष्मा क्रमांक काढून टाकण्यासाठीची बेळगावातील पहिली खरी ब्लेडलेस रोबोटिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली आहे.

सदर आधुनिक विकसित तंत्रज्ञान सर्व वयोगटातील लोकांना दृश्य परिणामांमध्ये अत्यंत अचूकता आणि उच्च सुरक्षा मानके प्रदान करते. हे झीमर झेड8 तंत्रज्ञान ब्लेडलेस, अत्यंत अचूकता आणि मोतीबिंदूसाठी जलद परिणामकारक अशी जागतिक दर्जाची खरी फेम्टो सेकंड लेसर आधारित रोबोटिक प्रक्रिया आहे.

फक्त एका मशीनद्वारे केली जाणारी ही प्रक्रिया चष्मा क्रमांक काढून टाकण्यासाठी क्लिअर लेसिक आणि बुबूळ प्रत्यारोपणासाठी देखील परिणामकारक आहे.

रोबोटिक माध्यमातून मोतीबिंदू व क्लिअर लेसिक शस्त्रक्रियेचा हा टप्पा एम.एम. जोशी -कोडकनी सुपर स्पेशालिटी आय सेंटरची गेल्या 60 वर्षांतील नेत्ररोगशास्त्रातील आघाडीची प्रतिष्ठा अधिक मजबूत करतो.

हे आय सेंटर उत्तर कर्नाटकातील लोकांबद्दल आपुलकी बाळगून अत्यंत परवडणाऱ्या किमतीत अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नवोपक्रम आणण्याचे त्यांचे ध्येय पूर्ण करत आहे. झीमर झेड8 तंत्रज्ञान आता उत्तर कर्नाटकातील एम.एम. जोशी आय इन्स्टिट्यूटच्या सर्व केंद्रांवर उपलब्ध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.