belgaum

पत्नीवर खुनी हल्ला करणाऱ्या पतीला १० वर्षे सक्तमजुरी

0
467
Conviction
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव न्यायालय परिसरातच स्वतःच्या पत्नीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीला बेळगावच्या न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरी आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. शिवप्पा निंगप्पा अडकी असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

आरोपी शिवप्पा आणि जयमाला अडकी हे पती-पत्नी असून त्यांच्यात कौटुंबिक वाद होता. २९ सप्टेंबर २०२१ रोजी बैलहोंगल न्यायालयात सुनावणीसाठी जयमाला आल्या होत्या.

न्यायालयाचे कामकाज संपवून त्या कॅन्टीनमधून बाहेर येत असताना, शिवप्पाने त्यांच्यावर कोयत्याने भीषण हल्ला केला. त्याने जयमाला यांच्या डोक्यावर, मानेवर आणि हाता-पायावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले होते. या हल्ल्यात जयमाला यांचा पाय कापला गेला होता.

९ व्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुभाष संकदम यांनी या प्रकरणाची सुनावणी घेतली. आरोपीवरील आरोप सिद्ध झाल्याने त्याला आयपीसी कलम ३०७ अंतर्गत १० वर्षे कारावास आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

या खटल्यात सरकार पक्षातर्फे ॲड. के. एन. पाटील यांनी प्रभावी युक्तिवाद करून आरोपीचा गुन्हा सिद्ध केला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.