belgaum

हिंडलगा कारागृह भिंतीवर बसविल्या जाणार ‘अँटि थ्रोईंग’ जाळ्या

0
528
 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगावच्या हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना बाहेरून वस्तू फेकून मदत करण्याच्या वाढत्या घटनांमुळे कारागृह प्रशासन अधिक सतर्क झाले असून त्यांनी कारागृहाच्या भिंतीवर वस्तू फेकण्यास प्रतिबंध करणाऱ्या ‘अँटि थ्रोईंग’ जाळ्या बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

अलीकडे कांही दिवसांपूर्वी हिंडलगा कारागृहाच्या संरक्षक आवार भिंती बाहेर उभे राहून एक युवक आत साहित्य फेकत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

या घटनेनंतर कारागृह सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. यापूर्वीही कैद्यांना बाहेरून मदत करण्यासाठी मोबाईल फोन, सिम कार्ड, सिगारेट, गांजा, धारदार शस्त्रे वगैरे वस्तू भिंती पलीकडे फेकल्याच्या घटना उघडकीस आले आहेत.

या पार्श्वभूमीवर तसेच अलीकडच्या घटनेनंतर कारागृहाच्या भिंतींवर मजबूत ‘अँटी थ्रोइंग’ जाळ्या बसवण्यात येणार आहेत. तसेच भिंती लगतचे रस्ते तात्पुरते बॅरिकेड लावून दुचाकी व संशयास्पद हालचालींवर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना स्थानिक पोलिसांना देण्यात आल्या आहेत. कारागृहात मोबाईल सिग्नर रोखण्यासाठी जॅमर बसविण्यात आले असले तरी एका सेवा पुरवठादाराचा सिग्नल आतपर्यंत पोहोचत असल्याचे आढळले आहे.

त्यामुळे संबंधित यंत्रणेला या त्रुटी तातडीने दूर करण्याचे निर्देश देण्यात आले असून कारागृह परिसरात कोणत्याही प्रकारचा सिग्नल उपलब्ध राहू नये यासाठी उपाययोजना सुरू आहेत. एकंदर या सर्व उपाययोजनांमुळे यापुढे हिंडलगा मध्यवर्ती कारागृहाची सुरक्षा अधिक कडक होणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.