belgaum

हिंडलगा कारागृहातील गैरप्रकारांना अधिकाऱ्यांना धरले जाईल जबाबदार -डीजीपी अलोककुमार

0
450
alok kumar igp
 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटकचे पोलीस महासंचालक (डीजीपी) अलोककुमार यांनी काल मंगळवारी हिंडलगा येथील मध्यवर्तीय कारागृहाला सरप्राईज व्हिजीट अर्थात अचानक भेट देऊन तेथील सुरक्षा व्यवस्थेची सर्वंकष पाहणी केली. तसेच पाहणीअंती कारागृहात कोणतेही गैरप्रकार आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

राज्याचे पोलीस महासंचालक अलोक कुमार यांनी काल बेळगाव येथील हिंडलगा मध्यवर्ती कारागृहाला भेट देऊन पाहणी करण्याबरोबरच तेथील कामकाजाचे निरीक्षण केले. यावेळी झालेल्या बैठकीत हिंडलगा कारागृहामध्ये 5-जी जामर प्रणाली कार्यान्वित असतानाही नेटवर्क उपलब्ध होत असल्याच्या तक्रारी, तसेच बाहेरून मोबाईल फोन व अंमली पदार्थ फेकले जात असल्याच्या आरोपावर गांभीर्याने चर्चा झाली.

अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर उपाय योजना राबविण्याचे आदेश डीजीपी यांनी दिले. कारागृह सुरक्षा व्यवस्थेमध्ये कोणतीही ढिलाई सहन केली जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

 belgaum
HIndlga jail
Belgaum hindlga jail

देखरेख यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर देत तांत्रिक साधनसामग्री आणि मनुष्यबळाचा प्रभावी वापर करण्याचे निर्देशित देखील त्यांनी दिले. कैद्यांच्या हालचालीवर सतत लक्ष ठेवणे संवेदनशील भागात अतिरिक्त सुरक्षा तैनात करणे आणि नियमित तपासणी मोहीम राबविणे यावर डीजीपी अलोककुमार यांनी विशेष भर देऊन संबंधित अन्य सूचना केल्या.

डीजीपी यांच्या कालच्या पाहणी दौऱ्याप्रसंगी कारागृह व सुधारणा सेवा विभागाचे उत्तर विभाग आयजीपी टी. पी. शेष, आयजीपी चेतनसिंग राठोड, पोलीस आयुक्त भूषण बोरसे, जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन, कारागृह अधीक्षक कृष्णमूर्ती आणि अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.