बेळगाव लाईव्ह : भूसंपादनाचा मोबदला न दिल्याने जप्त करण्यात आलेली बेळगाव जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राहुल शिंदे यांची सरकारी कार अखेर गुरुवारी न्यायालयाच्या आदेशाने मुक्त करण्यात आली.
बैलहोंगल तालुक्यातील कुलवळ्ळी ल्ली येथील जमिनीच्या मोबदल्यावरून उद्भवलेल्या वादातून न्यायालयाने ही जप्तीची कारवाई केली होती.
बैलहोंगल तालुक्यातील कुलवल्ली येथील देसाई कुटुंबाची २१ एकर जमीन सरकारने संपादित केली होती. या जमिनीवर नागरी सुविधा आणि सरकारी इमारती उभारल्या असल्या तरी, बाधित कुटुंबाला ९० लाख रुपयांचा थकीत मोबदला अद्याप मिळालेला नाही.
न्यायालयाच्या आदेशानंतरही वर्षभर प्रशासनाने टाळाटाळ केल्याने बुधवारी सीईओंची गाडी जप्त करण्याची नामुष्की ओढवली होती. मोबदला न मिळाल्यास कार्यालयातील फर्निचर आणि संगणकही जप्त करण्याचे संकेत सरकारी वकिलांनी दिले होते.
मात्र, गुरुवारी कायदेशीर प्रक्रियेनंतर न्यायालयाने गाडी सोडण्याचे आदेश दिले, असे त्यांनी स्पष्ट केले.





