belgaum

गोवा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. विनोद गायकवाड

0
554
dr vinod gaikwad
 belgaum

बेळगाव लाईव्ह- 31 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान विजयदुर्गा देवस्थान, केरी, गोवा येथे होणाऱ्या विसाव्या शेकोटी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ख्यातनाम साहित्यिक प्रा डॉ विनोद गायकवाड यांची निवड झाली आहे.

या संमेलनात साहित्यावर आधारित विविध कार्यक्रम होणार आहेत. साहित्य संस्था आणि समाज या विषयावर परिसंवाद होणार आहे त्या मध्ये विलास कोळेकर, सुहास बुवा वझे, जनार्दन वेर्णेकर आणि कृष्णाजी कुलकर्णी यांचा सहभाग आहे. त्यानंतर सदाफुली कवी संमेलन होणार असून त्यात विविध कवी आपल्या कविता सादर करतील.


ए आय आणि समाज स्वास्थ” या विषयावर होणाऱ्या परिसंवादात रामराव वाघ, गीता वेर्लेकर, मधुसूदन जोशी ,भक्ती महाजन ,प्राप्ती गावकर, नेहा उपाध्ये, श्रेया टेंगसे, संगीता नाईक आदी सहभागी होतील.

dr vinod gaikwad

याशिवाय निमंत्रितांचे कवी संमेलन, पुस्तकातील नायीका बोलतात तेव्हा, ग्रंथ प्रकाशन ,पुरस्कार प्रदान अशा विविध कार्यक्रमांची या संमेलनात रेलचेल आहे. शेकोटी संमेलन हे गोव्यातील एक ख्यातनाम संमेलन म्हणून ओळखले जाते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.