belgaum

बेळगावच्या उदय भवन हॉटेलमधील चोरीचा छडा;

0
990
 belgaum

बेळगाव लाईव्ह : टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरपीडी सर्कलजवळील देशमुख रोडवर असलेल्या उदय भवन हॉटेलमध्ये झालेल्या चोरीचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले आहे.

याप्रकरणी हुबळी येथील एका सराईत चोरट्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अविनाश रायरसंग (रा. विद्यानगर, हुबळी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने उदय भवन हॉटेलमध्ये चोरी केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. टिळकवाडी पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवून संशयित आरोपीला हुबळी येथून ताब्यात घेतले.

पोलिसांनी केलेल्या या कारवाईत आरोपीकडून ८.४८ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी, ज्याची किंमत ९५ हजार रुपये आहे, तसेच ८ हजार रुपये किमतीचा मोटो जी-५ एस प्लस मोबाईल जप्त केला आहे. एकूण १ लाख ३ हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.