बेळगाव लाईव्ह : बुकिंग पोर्टलवर काही काळासाठी विमानांची माहिती दिसत नसल्यानंतर स्टार एअरलाइन्सने 15 जानेवारी 2026 पासून बेळगाव-अहमदाबाद (एएमडी) मार्गावर बुकिंग पुन्हा सुरू केले आहे. यामुळे बेळगावच्या प्रवाशांना कांहीसा दिलासा मिळाला आहे.
हा दिलासा मिळाला असला तरी बेळगाव-जयपूर मार्गावर 15 जानेवारी ते 31 जानेवारीपर्यंत बुकिंग उपलब्ध नाही, मात्र 1 फेब्रुवारीपासून बुकिंग दिसत आहे. सध्या जयपूर सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे, की दीर्घकाळासाठी बंद केली जात आहे याबाबत एअरलाइनकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही.
अहमदाबाद मार्गावरील सेवा पूर्ववत झाल्याने कांहीसा दिलासा मिळत असला तरी, जयपूरसाठी बुकिंग उपलब्ध नसणे बेळगावच्या हवाई संपर्काभोवतीची अनिश्चितता अधोरेखित करत असून जी मुंबई मार्गाच्या आधीच्या बंदमुळे यापूर्वीच प्रभावित झाली आहे.

मुंबई मार्गावरील सेवा या आधीच बंद झाल्यामुळे बेळगावचा हवाई संपर्क (कनेक्टिव्हिटी) तणावाखाली आहे. या घडामोडींमुळेच ‘सेव्ह आयएक्सजी’ सारख्या उपक्रमांना गती मिळत असल्याचे अधोरेखित होत आहे.
नागरिक आणि संबंधित घटक शहरासाठी सातत्यपूर्ण, पारदर्शक आणि दीर्घकालीन हवाई संपर्काची अपेक्षा बाळगत असल्यामुळे ‘सेव्ह आयएक्सजी’ची मागणी केली जात आहे. सद्य परिस्थितीत प्रवासी आणि संबंधित घटक आता शेवटच्या क्षणीच्या आश्चर्यांऐवजी स्पष्टता आणि सातत्याची अपेक्षा करत आहेत.




