बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेच्या जन्म दाखला विभागाच्या कार्यालयाचे शटर देखभाली अभावी कामकाज सुरू असताना अचानक खाली घसरून बिघडल्यामुळे एकच गोंधळ उडाल्याची घटना आज मंगळवारी घडली.
बेळगाव महापालिकेच्या जन्म दाखला विभागाच्या कार्यालयाचे कामकाज आज सकाळी नेहमीप्रमाणे सुरू झाले. त्यानंतर अल्पावधीत कार्यालयाचे शटर अचानक मोठा आवाज करत खाली कोसळून कार्यालय बंद झाले.
परिणामी अधिकारी कर्मचाऱ्यांसह कांही नागरिक आताच अडकून पडले. शटर खाली पडताच बाहेर उभे असलेले नागरिक आणि त्यानंतर त्यांच्या मदतीस धावलेल्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी शटर पुन्हा उघडण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
मात्र देखभाली अभावी खराब झालेले शटर फुटभर वर सरकून त्या ठिकाणीच अडकून पडले. त्यानंतर शटर दुरुस्त करण्याचे काम दुपारी उशिरापर्यंत सुरू होते.

तथापी शटर अचानक बंद होऊन नागरिकात अडकून पडल्यामुळे जन्म दाखला विभाग कार्यालयाच्या ठिकाणी कांही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
त्याचप्रमाणे महापालिकेला खुद्द स्वतःच्या मालमत्तेची व्यवस्थित देखभाल करता येत नसेल तर ती शहराची देखभाल काय करणार? अशा उपहासात्मक प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शींमध्ये व्यक्त होत होत्या.





