बेळगाव लाईव्ह : खानापूर तालुक्यातील इदलहोंड येथील प्रगतशील शेतकरी माधव जाधव यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केवळ २० गुंठे क्षेत्रात १८.५५३ टन उसाचे भरघोस उत्पादन घेण्याची किमया साधली असून त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
इदलहोंड गावातील प्रगतशील शेतकरी माधव जाधव यांनी आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करून अवघ्या २० गुंठे क्षेत्रात तब्बल १८.५५३ टन उसाचे भरघोस उत्पादन घेतले आहे.
मर्यादित क्षेत्रातही योग्य नियोजन, सुधारित बियाणे, संतुलित खत व्यवस्थापन आणि नियोजित पाणीपुरवठा केल्यास उत्तम उत्पादन मिळू शकते, हे त्यांनी आपल्या यशातून दाखवून दिले आहे.

जाधव यांच्या या यशामुळे परिसरातील शेतकऱ्यांना प्रेरणा मिळत असून ऊस शेतीत नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कृषी तज्ज्ञ आणि शेतकरी वर्गाकडून कौतुक होत आहे.





