belgaum

हिंडलगा कारागृह कर्मचाऱ्यांची ‘शांताई’मध्ये स्वच्छता मोहीम, सांस्कृतिक कार्यक्रम

0
329
 belgaum

बेळगाव लाईव्ह :हिंडलगा मध्यवर्ती कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी आज शनिवारी शांताई वृद्धाश्रमाला भेट देऊन वृद्धाश्रमाच्या आवारात स्वच्छता मोहीम राबवण्याव्दारे आपल्या सामाजिक बांधिलकी, जबाबदारीचे दर्शन घडवले.

शांताई वृद्धाश्रमाच्या भेटीचे नेतृत्व हिंडलगा कारागृह अधीक्षक कृष्णमूर्ती, उपअधीक्षक मंजुनाथ कोप्पड आणि केएसआरपी पोलीस निरीक्षक सुरेश यांनी केले. यावेळी त्यांच्यासोबत कारागृह अधिकारी व कर्मचारी असे सुमारे 100 जण उपस्थित होते. सर्वांनी वृद्धाश्रमाचा परिसर झाडलोट करून स्वच्छ करण्यात सक्रिय सहभाग घेतला.

तसेच स्वच्छतेचा आणि ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्याचा संदेश दिला. स्वच्छता मोहिमेसोबतच त्यांनी शांताई वृद्धाश्रमातील सदस्यांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नृत्य आणि गायनाचे कार्यक्रम सादर करून वृद्ध सदस्यांचे मनोरंजन करत भावनिक ऊब निर्माण केली. या कार्यक्रमांमुळे एक उत्साही आणि आनंदी वातावरण निर्माण झाले होते.

या प्रसंगी माजी महापौर विजय मोरे, वसंत बालिगा, मारिया मोरे आणि शांताई वृद्धाश्रमाचे कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी हिंडलगा कारागृह अधिकाऱ्यांनी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले आणि वृद्धाश्रमातील रहिवाशांसोबत चांगला वेळ घालवून आनंद पसरवल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.